Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत | शहीद ए वतन | हजरत टिपू सुलतान यांचा जन्मोत्सव साजरा |

 




परळीत शहीद ए वतन
हजरत टिपू सुलतान यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

परळीत भारतातील पहिले मिसाईल मॅन शहीद हजरत टिपू सुलतान र.ह.यांचा जन्मदिवसया निमित्त शहरातील परळीत टिपू सुलतान यांचा जन्मउत्सव उत्साहात साजरा परळीतील डॉ झाकीर हुसेन चौक बरकत नगर येथून मार्डन महाविद्यालय ते टावर चौक, कूषी उत्पन्न बाजार समिती ते एक मिनार चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. 


आज जन्मउत्सव निमित्त रविवारी मुस्लिम बांधवांनी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत पोलिसांच्या तगडा बंदोबस्त होता


टिपू सुलतानने ब्रिटीशांविरुद्ध अनेक युद्धे लढली, त्याच्या राज्याचे पूर्ण संरक्षण केले आणि चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धात लढताना त्याचा मृत्यू झाला. म्हैसूरचा वाघ म्हणून प्रसिद्ध असलेले टिपू सुलतान ब्रिटिशांविरुद्धच्या युद्धांमध्ये त्यांच्या शौर्यासाठी ओळखले जातात. 


हैदर अलीचा मोठा मुलगा, म्हैसूरचा सुलतान,१७८२ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर टिपू सुलतान सिंहासनावर बसले.शासक म्हणून त्यांनी आपल्या प्रशासनात अनेक नवकल्पना राबवल्या आणि लोह-आधारित मैसूरियन रॉकेटचा विस्तार केला,जे जगातील पहिले रॉकेट असल्याचे म्हटले जाते. त्याच्या वडिलांचे फ्रेंचशी राजनैतिक संबंध होते,


ज्यामुळे टिपू सुलतानने फ्रेंच अधिकाऱ्यांकडून लष्करी प्रशिक्षण घेतले.शासक झाल्यावर,त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध फ्रेंचांशी लढताना वडिलांचे धोरण चालू ठेवले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या