Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीच्या बस स्थानकासमोर सैदव वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा... पोलिसांचा पत्ताच नाही

 




परळीच्या बस स्थानकासमोर सैदव वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा... पोलिसांचा पत्ताच नाही

परळीच्या बस स्थानका समोर व बस स्थानक परिसरात अवैध वाहतुकीने धुमाकूळ घातला असून  संपूर्ण रस्ता ग्रासला आहे.  तसेच रेल्वे स्टेशन चौक, बस स्थानकाच्या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्त्यवस्थ पार्किंग आणि उभी केलेली वाहने अपघातांची संख्या वाढत असून याकडे वाहतूक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष का ? गेल्या महिन्यातच या अवैध वाहतुकीमुळे परिसरात एका निष्पाप व्यक्तीचा अपघातात मृत्यू  झाला होता तरीही पोलिसांनी या भागात अजूनही कारवाई केलेली नाही. परळी शहरात पोलिसांचा वचकच राहिली नसून व्यवस्था पार  कोलमडून गेली की काय असा सवाल नागरिक करत आहेत.


 परळी बस स्थानकाच्या समोरील खाजगी वाहतूक व्यवस्थेने वाहतुकी व्यवस्थेचे तिनतेरा वाजवले असून रोज सायंकाळी व दिवसाही या भागात खाजगी ट्रॅव्हल्स धारकांची मनमानी आणि भर रस्त्यात ट्रॅव्हल्स उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो.


 याकडे परळी वाहतूक पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे का ?                                      बसस्थानका समोरील रस्त्यावर ट्रॅव्हल्स बससाठी असणारी प्रवाश्याची गर्दी भर रस्त्यात वाहने उभी असतात आणि त्यातच रस्त्यावरून  अवजडवाहनांची वाहतुक, ही कोंडी सोडवण्याची जबाबदारी कोणाची... परळी शहरातील या बेशिस्त वाहतुकीला वळण कोण लावणार असा सवाल येथील नागरिक करत आहेत.


*मोठी खळबळ ..! शिक्षण क्षेत्रात  एका शिक्षण अधिकाऱ्यासह लिपिकास लाच घेताना अटक..*

👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_77.html

*डिजिटल मिडियाला प्रिंटमिडिया प्रमाणे आपली विश्वासार्हता सिध्द करावी लागेल |एस.एम.देशमुख*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_63.html*

👇👇👇👇

*all हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या