Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षण क्षेत्रात खळबळ एका शिक्षण अधिकाऱ्यासह लिपिकास लाच घेताना अटक...



शिक्षण क्षेत्रात खळबळ एका शिक्षण अधिकाऱ्यासह लिपिकास लाच घेताना अटक...

सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर कारवाई झाली असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 25 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले.


किरण लोहार यांच्या सोबतच प्राथमिक शिक्षण विभागातील एका लिपिकाची चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार किरण लोहार यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन साधारण 13 महिने झाले होते.मात्र त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले तर कायमच वादग्रस्त राहिले आहे. 


कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नव्हती अशा तक्रारी वारंवार ऐकण्यास मिळत होत्या अखेर शेवटी आज मासा गाळाला लागला त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई झाली.


या प्रकरणातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वयं अर्थसहाय्य शाळा आहे.त्यांना वर्ग वाढीसाठी यूडायस या प्रणालीत नोंदणी करून प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती.


तडजोडी यांनी25000 देण्याचे ठरले मात्र तक्रारदार यांनी अँटी करप्शन विभागाशी संपर्क साधून तक्रार केली.आज सोमवारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात पाच वाजून45मिनिटांनी त्यांना 25000घेतल्याचे रंगेहात पकडण्यात आले आहे. 



सविस्तर माहिती थोड्यावेळात ..


*अंबाजोगाईत खोल दरीत उडी मारून 20 वर्षीय युवकाची आत्महत्या..

👇👇👇👇👇

https://aplaepaper.blogspot.com/2022/10/20.html

*आजच्या ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_online*

https://youtu.be/dM3yoAayfVg

join my WhatsApp group: *https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

👇👇👇👇👇

*all हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या