Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अबब..ss परळीत चक्क मंदिरातील दानपेटीवरच चोराने मारला डल्ला..

 


अबब..ss परळीत चक्क मंदिरातील दानपेटीवरच चोराने मारला डल्ला..



परळी शहरातील कावेरी प्लाझा  लगत असलेल्या श्रीहनुमान मंदिरा समोरील दोन दान पेट्यांचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम पळविल्याची घटना काल मध्यरात्रीच्या दरम्यान ही घटना घडली आहे. 

अज्ञात चोरांनी मंदिरातच चोरी केली असून या चोरीचा तपास करून चोरांना अटक करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


परळीतील घरणीकर रोड व कावेरी प्लाझा या रस्त्यावर जुने हनुमान मंदिर आहे. या मंदिरात अनेक  भटकंती करणारे साधू व प्रवाशी निवारा म्हणून काही काळ थांबलेले असतात.या मंदिरात दर्शनासाठी  भाविक नेहमीच जातात. 


या श्री हनुमान मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने दोन दानपेट्यांचे कुलूप तोडून टाकले व आतील भाविकांनी दान केलेली रक्कम पळवली आहे. याबाबत नर्मदा प्रसाद हनुमान मंदिराच्या विश्वस्तांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.अधिक तपास परळी पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या