Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक |अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पोलिसात गुन्हा दाखल |आरोपीस अटक |पोलीस तपास सुरू



धक्कादायक |अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पोलिसात गुन्हा दाखल |आरोपीस अटक |पोलीस तपास सुरू

परळी/ आपला@पेपर

परळी जवळ असलेल्या सिरसाळा येथे अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सिरसाळा येथे घडली असून याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेत सिरसाळा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.


पोलीस सुत्रांकडून मिळालेली प्राथमिक माहितीनुसार गर्देवाडी येथील 40 वर्षीय इसमाच्या फिर्यादीवरून फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 13 वर्ष 5 महीने ही दि.22/10/22 रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता शिवाजी नगर तांडा सिरसाळा येथे राहत असलेल्या आजी आजोबा घरुन प्रमोद सोमनाथ सलगर रा.मुंगी ह्यांंने पळवुन घेवुन गेल्याचे फिर्याद दिलेली होती.असे या फिर्यादमध्ये नमुद केले होते.


त्यांचे फिर्यादवरून गुरनं 205 / 2022 कलम 363 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.


आज शुक्रवार दि 4 रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी सापडली असून तिने सिरसाळा पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, प्रमोद सोमनाथ सलगर रा.मुंगी याने माझ्या ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले वअत्याचार केला.



या प्रकरण सदर जबाबावरुन अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या दिलेल्या फिर्यादीत 376(2) (एन), 376 (2) (जे), 120 (ब) भादंवि सह कलम 4,6,17 बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा 2012 सह कलम 9,10 बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम वाढ करण्यात आले आहेत.


गुन्हयातील आरोपींस सिरसाळा पोलिसांनी अटक केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास अतिरिक्त प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक पुंडगे मॅडम पिंक मोबाईल पथक उपविभाग माजलगांव हे करीत आहे.


*परळीत घरफोडी...**|अज्ञात चोरट्याने पळवले दुचाकीसह अकरा लाख रुपये*

https://aplaepaper.blogspot..com/2022/11/blog-post_69.html

*अपघात |अज्ञात वाहनामुळे चार वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू*              

👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_75.html*

*संतोष बारटक्के*    *9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या