अज्ञात वाहनाच्या अपघातात चार वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू
अंबाजोगाई दुचाकीवरून पडलेल्या एका चार वर्षाच्या मुलाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज अंबाजोगाई रस्त्यावरील चंदनसावरगाव येथे आज घडली आहे.
कुंबेफळ (ता. केज) येथील धनराज रतन पवार, त्यांची पत्नी हे त्यांचा चार वर्ष वयाचा पुतण्या आशिष खंडू पवार हे तिघे ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या दुचाकीवर बसून अंबाजोगाईहुन गावाकडे येत होते. ते केज - अंबाजोगाई रस्त्यावरील चंदनसावरगाव येथील हॉटेल निसर्ग जवळ आले असता आशिष हा गाडीवरून खाली पडला. त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला चिरडले. यात आशिष खंडू पवार या चार वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांनी पोलीस नाईक संपतराव शेंडगे यांना अपघातस्थळी रवाना केले. पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले आहे.अधिक तपास सुरू आहे


Social Plugin