Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत घरफोडी |अज्ञात चोरट्याने पळवले दुचाकीसह अकरा लाख रुपये



परळीत घरफोडी |अज्ञात चोरट्याने पळवले दुचाकीसह अकरा लाख रु 

बँक कॉलनीतील चोरीच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती 

#परळी/ आपला@पेपर 

#परळी_शहरातील बँक कॉलनी भागात राहणाऱ्या एका हॉटेल चालकाच्या घरातील कपाटातून 11लाख 87हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम,टीव्ही,दुचाकी असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि .3 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. 



याप्रकरणी परळी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक कॉलनी भागात राहणारे हॉटेल व्यावसायिक बाबासाहेब नानाभाऊ मुंडे हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते.घर कुलूप बंद होते.तर घरात कोणीच नव्हते याचा फायदा घेत.त्यांच्या घराचा दरवाजा दोन नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश केला.घरातील 11लाख 87हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला,त्यामध्ये रोख अडीच लाख रुपये व सोन्याच्या नऊ अंगठ्या, एक ब्रासलेट,टीव्ही व दुचाकी असा ऐवज असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. 


दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध परळी शहर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या चोरीच्या तपासासाठी एक विशेष पथक नियुक्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी दिली आहे.


घटनास्थळी अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड,पो. नि.कस्तुरे यांनी भेट दिली आहे.


*अपघात |अज्ञात वाहनामुळे चार वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू*     

         

👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_75.html*



*संतोष बारटक्के*    *9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या