Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बाळासाहेब ठाकरे यांनी मना-मनात स्वाभिमानाची मशाल पेटवला-अभयकुमार ठक्कर

 


बाळासाहेब ठाकरे यांनी मना-
मनात स्वाभिमानाची मशाल पेटवली-अभयकुमार ठक्कर

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी परळीत शिवसैनिकांनी केले अभिवादन

 आपला@पेपर/परळी 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज गुरूवार दि.17 नोव्हेंबर रोजी परळी वैजनाथ येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवसैनिकांनी अभिवादन केले.



शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुरुवार दि. 17 नोव्हेंबर  रोजी परळी वैजनाथ येथे सकाळी 11:30 वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात प्रतिमेचे पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेे बीड उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर, बीड जिल्हा युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे, मा.उप शहर प्रमुख सतिष जगताप यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. 


यावेळी बोलतांना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर म्हणाले की, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान पेटवला, अन्याया विरुध्द लढण्याची वृत्ती निर्माण केली. 



  आपल्या न्याय,हक्कासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.त्यांच्या ज्वलंत विचारांमुळेच मराठी माणूस आज कणखरपणे उभा आहे.



या प्रसंगी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अमर रहे, अमर रहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे,  तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.



यावेळी उपजिल्हाप्रमुख अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर, बीड जिल्हा युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे,परळी विधानसभा प्रमुख राजा भैय्या पांडे,मा.उप शहर प्रमुख सतिष जगताप, युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी,शिवसेना तळ विभाग  प्रमुख श्रीनिवास सावजी,  छ.शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी,बबन ढेंबरे, विद्यार्थी सेना  तालुका समन्वयक  अमित कचरे, युवासेनेचे मनिष जोशी, नवनाथ वरवटकर,योगेश घेवारे, संस्कार पालिमकर,श्रयश कराड, आकाश चव्हाण, प्रकाश देवकर, योगेश जाधव, बजरंग औटी,सिद्धार्थ गायकवाड, भगवान वाघमारे, बाळासाहेब सातपुते,सचिन लोढा यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या प्रसंगी सर्व उपस्थित शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला अनुसरुन कार्यरत राहण्याची आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठाची शपथ घेतली.


*थेट मोबाईलमध्ये नंबर नसला तरी*

*फोन करणार्‍याचे नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार..*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_45.html


*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

अबबss चमत्कार प्रभू वैजनाथच्या मुख्य मंदिराच्या कळसांमध्येच सापडली महादेवाची पिंड ?*

👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/11/ss_11.html

*हेडलाईन्स न्यूज*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या