Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्यचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी ‘बंसल क्लासेस’ व शैक्षणिक कर्ज योजनेचे सर्वत्र कौतुक स्वागत

 










राज्यचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी ‘बंसल क्लासेस’ व शैक्षणिक कर्ज योजनेचे सर्वत्र कौतुक स्वागत

सामर्थ्य महाराष्ट्राचे  : वेध भविष्याचा, मंथन विचाराचे’ कार्यक्रमात कौतुक; मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी यांची मुलाखत

मुंबई ‘साम टीव्ही’ आयोजित ‘सामर्थ्य महाराष्ट्राचे : वेध भविष्याचा, मंथन विचाराचे’ या कार्यक्रमात मंगळवारी (१५ नोव्हेंबर)‘बंसल क्लासेस’ महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी यांची मुलाखत घेण्यात आली. 


यावेळी बियाणी यांनी ‘बंसल क्लासेस’ शैक्षणिक सुविधा, उद्देश आणि शून्य टक्के व्याजदरावर आधारित शैक्षणिक कर्ज, अशा अनेक मुद्यांना आपल्या मुलाखतीत अधोरेखित केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘बंसल क्लासेस’च्या शून्य टक्के व्याजदराच्या शैक्षणिक कर्ज सुविधेचे स्वागत केले. 


यावेळी चंदुलाल बियाणी यांनी सांगितले की, ‘बंसल क्लासेस’ महाराष्ट्रतर्फे ग्रामीण आणि शहरी भागांतील विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावीपर्यंत उत्कृष्ट शैक्षणिक सेवा देण्यात येत आहेत.अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून ‘नीट’ आणि ‘जेईई’ परीक्षेची तयारी करवून घेत आहोत. 


यासाठी प्रशिक्षित शिक्षकवर्ग कोटा येथून पुरविला जातो. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होत आहे. विशेष करून ज्या विद्यार्थ्यांना पैशाअभावी दर्जेदार शिक्षण घेता येत नाही, त्यांच्यासाठी ‘बंसल क्लासेस’तर्फे शून्य टक्के व्याजदराच्या शैक्षणिक कर्जाची सुविधा आम्ही देत आहोत. 


यासाठीचा कर्जपुरवठा ‘राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थे’कडून केला जाणार आहे.यावेळी ‘बंसल क्लासेस’तर्फे शून्य टक्के व्याजदराच्या शैक्षणिक कर्ज सुविधेचे उच्च-शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वागत केले.


विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंदुलाल बियाणी, कैलास घुगे यांच्यासमवेत चर्चा करून या योजनेचे कौतुक केले आणि अधिक माहिती घेतली. 


‘सामर्थ्य महाराष्ट्राचे: वेध भविष्याचा, मंथन विचाराचे’ या कार्यक्रमासाठी को-स्पाँसर्ड म्हणून ‘बंसल क्लासेस’ समूहास मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.


या कार्यक्रमाप्रसंगी ‘बंसल क्लासेस’ महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवर्तक श्री.चंदूलाल बियाणी, सी.ई.ओ.प्रा.कैलास घुगे, मीडिया आणि क्रिएटीव्ह हेड श्री.गोविंद ठोंबरे उपस्थित होते. 

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च-शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,औद्योगिक मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदींची उपस्थिती होती. जयंत पाटील यांनी आवर्जून ‘बंसल क्लासेस’ची व्यक्तिगत माहिती घेऊन सर्वांशी संवाद साधला. तसेच महाराष्ट्र राज्याचे औद्योगिक मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील संवाद साधला. 

यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील दीपाली सय्यद, प्रशांत दामले, स्वामी समर्थ मालिका फेम व मुख्य कलाकार अक्षय मुदावाडकर, मानसी नाईक यांनीही संवाद साधला.


*🎯आजचा ई-पेपर* ब्रेकिंग न्यूज
तुमच्या मोबाईलवर केव्हाही वाचा संपूर्ण पेपर

*🎯दैनिक मराठवाडा साथी*
*🎯बातमी एका क्लिकवर डाउनलोड करा. तसेच सोशल मीडियावर शेअर करा...*
👇👇👇
*वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_15.html*

*http://epaper.marathwadasathi.com/

🎯दैनिक मराठवाडा साथी न्यूज*
🎯*संतोष बारटक्के*      *9423472426
*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या