Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सशस्त्र दरोडात 33 तोळे सोने लंपास महिलेला मारहाण चोरांचा धुमाकूळ

 


सशस्त्र दरोडात 33 तोळे
सोन्याचा ऐवज लंपास महिलेला मारहाण वीस मिनिटं चोरांचा धुमाकूळ


जालना जिल्ह्यात सशस्त्र दरोडा नवरा बायकोला मारहाण करून वीस मिनिटं चोरांचा धुमाकूळ या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, चोरटे घराच्या छतावरून खाली आले आणि उर्वरित चोरट्यांनी मुख्य दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. 


तीर्थपुरी येथील चुडचिचा माळा येथील उल्हासराव पवार यांच्या घरात आज (शुक्रवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी प्रवेश केला. उल्हासराव पवार व त्यांच्या पत्नी घरात झोपले होते.यावेळी रिंगणाच्या आवाजाने उल्हासराव खडबडून जागे झाले.त्यांचा धाकटा भाऊ सुरेश पवार हे घराशेजारी झोपले असून त्यांना बोलावले असता ते उठून घराबाहेर आले. 


दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करून पत्नीला मारहाण केली. सोन्याच्या बांगड्या,अंगठ्या व कपाट,बांगड्या,नेकलेस,राणीहार, गंठण,लॉकेट,अंगठी,पत्नीच्या कानातले सेट असा एकूण 33 तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला.


यावेळी दरोडेखोरांनी घराशेजारील दरवाजाचे कडीकोयंडे लावले होते. त्यांच्या घराशेजारी शेत असल्याने दरोडेखोर या ठिकाणाहून आले असावेत.असा अंदाज वर्तवला जात आहे.सुमारे वीस मिनिटे चोरट्यांनी घर फोडले.


या दरोड्यादरम्यान दोन चोरट्यांनी पती-पत्नीवर हल्ला करून त्यांना जखमी केले.या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांनी घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.


याघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे गुन्हे शाखेचे यांनी तात्काळ यावेळी फिंगर प्रिंट व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.


*रेशन ग्राहकांसाठी आनंदाची बातमी*

*|वजन काटाही ऑनलाईन होणार...|*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/pos.html



*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या