Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक | ऊसतोडणीला गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू

 



ऊसतोडणीला गेलेल्या मायलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू आठवड्यातली दुसरी घटना

केज तालुक्यातून ऊसतोडणीला गेलेल्या मायलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील विठ्ठल साई साखर कारखाना आवारात आज सकाळी घडली.


चार वर्षाच्या मुलला वाचवताना आई देखील विहिरीत बुडाली. सोहम(वय 4)आणि सोनाली संतोष घुले(वय24 )अशी मृतांची नावे आहेत. 


बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा असून अनेक काही राजकीय नेते पुढारी या ऊसतोड कामगारांच्या नावावर राजकीय पोळी भाजून घेत असले तरी यांचे आयुष्य मात्र आजही उघड्यावरच आहे. 


ना राहयला घर..ना झोपडी ना...प्यायला पाणी ना.. निवारा अशा परिस्थितीत संघर्ष करत हे ऊसतोड मजूर आपले जीवन जगत असतात ऊसतोड कामगाराच्या नावाने अनेक महामंडळे तथा राजकीय नेते यांनी या कुटुंबासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे.


परंतु तरीही आजही ते दुर्लक्षित असल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत अशी चर्चा सर्वत्र होत आहे


याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील संतोष दशरथ घुले हे आपल्या कुटूंबासह उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात विठ्ठलसाई साखर कारखान्यावर आपल्या बैलगाडीने ऊसतोड करण्यासाठी गेले होते.


आज सकाळी11वाजेच्या सुमारास संतोष घुले यांच्या पत्नी सोनाली संतोष घुले (वय 24) पाणी आणण्यासाठी कारखान्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदावर 4 वर्षांचा मुलगा सोहमसह गेल्या होत्या.


यावेळी पाय घसरून सोहम शेजारी असलेल्या विहिरीत पडला. हे पाहताच त्याला वाचविण्यासाठी सोनालीने विहिरीत उडी घेतली. परंतु,मायलेक दोघेही त्यात बुडाले. मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारी आई देखील विहिरीत बुडाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी गर्दी केली.काही वेळाने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या