Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Cctv | परळीत चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..चोर फरार..

 


Cctv | परळीत चोरीची घटना
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..चोर फरार..


परळीत शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बाजारपेठेत टेलर लाईन येथील आशिष तातेड यांच्या निवासस्थानी चोरीची घटना शनिवारी घडली असून यामध्ये दीड लाख रूपयांचा ऐवज चोरी गेला आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


परळी शहरातील टेलर लाईन परिसरात वर्धमान ज्वेलर्सच्या वर आशिष कचरूलाल तातेड यांचे निवासस्थान असून शनिवारी

मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला. त्यांच्या शेजारी असलेल्या एका इमारतीवरून चोरट्याने घरात प्रवेश करुन त्याने तीन कुलूपे तोडून घरामध्ये प्रवेश केला घरात असलेल्या जुन्या  तिजोरी उघडल्या गेल्या असून त्यामधील चांदीचे क्वाईन (एक किलो) चोरट्याने लंपास केले आहेत. घरात काहीच हाती लागले नाही म्हणून शेवटी चोरट्याने सोबतच लॅपटॉप सुद्धा चोरी केला  आहे. 



याबाबत परळी संभाजीनगर परिसर गुन्ह्याची नोंद झाली असून चौकशी व तपास सुरू आहे.

हेही परळीत अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गवते परिवाराने साजरी केली  आईची पुण्यतिथी...

👇👇👇👇👇👇

https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_85.html

*@संतोष बारटक्के-* *9423472426


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या