Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत श्रीकृष्ण मंदिरात दिवाळी हजोरोदिव्यांची लख्खप्रकाशात साजरी झाली...



परळीत श्रीकृष्ण मंदिरात दिवाळी हजोरोदिव्यांची लख्खप्रकाशात साजरी झाली...




उजळल्या हजारो ज्योती....

श्रीकृष्ण मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सव

परळी वैजनाथ येथील श्रीकृष्ण मंदिरात १ हजार १ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. परळीत दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी असं म्हणत उत्साहात दिवाळी साजरी झाली.

     भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली तो दिवस त्यामुळे गवळी समाजात या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. यामुळेच येथील श्रीकृष्ण मंदिरात पाडव्याच्या सायंकाळी हजारो दिवे एकमेकांना जोडत दीपोत्सवाची सुंदर आरास मांडण्यात आली होती या ज्योतीच्या प्रकाशातील भगवान श्रीकृष्णाचे सुंदर,गोजीरे रूप आपल्या डोळ्यांत साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

     दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीत राकेश जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले, पत्रकार प्रा.रवींद्र जोशी, संभाजी मुंडे, प्रथमेश भास्कर, नितीन भाकरे, निलेश जाधव, संभाजी काळे, प्रा.किशोर पवार, दशरथ गायकवाड, दया स्वामी, सौ. दीपा बागवाले, कु. सुरुची भास्कर, कु. श्रेया जाधव आदी  सहभागी झाले होते.

    सायंकाळच्या शांततेत मावळतीला निघालेला सूर्य व अमावस्ये नंतर निघणारा चंद्र, झोंबणारा थंड वारा आणि परिसरात रेखाटलेल्या रांगोळ्या एका उत्सवासाठी सज्ज होत्या. सायंकाळी ६वाजता मेणबत्त्या प्रज्वल‌ित झाल्या. 


मंदिर व परिसरात एका रेषेत लावलेल्या पणत्या मेणबत्तीने प्रज्वल‌ित होऊ लागल्या. पणत्यांच्या उभ्या,आडव्या रेषा एकमेकांत गुंफल्या गेल्या आणि श्रीकृष्ण मंदिर हजारो ज्योतीने  उजळून निघाले. दीपोत्सवाने श्रीकृष्ण मंदिराला चढलेला साज पाहण्यासाठी सायंकाळी परळीकरांनी मोठी गर्दी केली होती.


*नाथ प्रतिष्ठानच्यावतीने धनंजय मुंडेनी दिली अरगडेच्या कुटुंबाला 50 हजार रुपयाची आर्थिक मदत*

👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/10/50_27.html

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

राणा म्हणाले…
धन्यवाद संतोष भाऊ मस्त बातमी लावली