Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

NEET | परळीत यूट्यूबवरच अभ्यास करुन विनायकचे डॉक्टर व्हायचे स्वप्न साकार...


NEET| ट्यूबवरच अभ्यास करुन विनायकचे डॉक्टर व्हायचे स्वप्न साकार... 

परीक्षेत मिळवले 595 गुण 

जिद्द आणि चिकाटी असेल तर आर्थिक परिस्थिती अडसर ठरत नाही हे परळीच्या विनायक या विद्यार्थ्याने समाजाला दाखवून दिले आहे.आईच्या कष्टाची आणि आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने विनायकने डॉक्टर व्हायचे स्वप्न साकार करण्यासाठी ची उचललेले पहिले पाऊल यशस्वी ठरले...

विनायक अर्जुन भोसले याने यूट्यूबवर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पाहून स्व-अभ्यास करून NEET परीक्षेत 595 गुण मिळवले आहे....तो NEETची शिकवणी फी भरू शकत नसल्यामुळे,त्याने यूट्यूबवर कोर्सचे व्हिडिओ पाहून मेहनतीने अभ्यास केला आणि NEET परीक्षेत 595 गुण मिळवले.विनायक अर्जुन भोसले रा.सेलू ता.परळीच्या वडिलांचे 2014 मध्ये अपघाती निधन झाले. 


पतीच्या निधनानंतर विनायकची आई सुनीता यांनी लोकांची घरे कामे करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांना दोन मुले  आणि एक मुलगी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुनीताबाईंनी अंबाजोगाई गाठली.

*हो...परळीत बिनोंडेचा गणपती...चला तर मग कुठे आहे जाणून घेऊ...*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_8.html*

आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी अंबाजोगाईत घरकाम करण्यास सुरुवात केली. चार जणांचे हे कुटुंब एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहते.या ठिकाणी सर्वजण एकत्र अभ्यास करतात


.*हेही बातमी वाचा...बीडचे थेट पाकिस्तानशी कनेक्शन |12 कोटी रुपयांच्या बँक व्यवहार उघड*

*आपला@पेपर*

*हेडलाईन्स न्यूज*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/beef-12.html*


*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के* 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या