Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वृद्धापकाळाने निधन




ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वृद्धापकाळाने निधन

ब्रिटनच्या राजघराण्याच्या गादीवर सात दशके विराजमान झालेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

यादरम्यान,राजघराण्यातील सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला ब्रिटीश राजघराणे आणि ब्रिटिश सरकारने दुजोरा दिला आहे.

ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला एलिझाबेथच्या पश्चात चार मुले, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. एलिझाबेथच्या मृत्यूनंतर आता प्रिन्स चार्ल्स ब्रिटनच्या गादीवर बसणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या