Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पाटोदा जवळ भरधाव वेगातील कारचा ताबा सुटल्यामुळे अपघात |एकाचा जागीच मुत्यु

हेही  बातमी वाचा सततच्या अपघातामुळे केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांनी घेतला हा निर्णय 👇👇https://aplaepaper.blogspot.com/2022/09/3.html


पाटोदा जवळ भरधाव वेगातील कारचा ताबा सुटल्यामुळे अपघात एकाचा जागीच मुत्यु 

सासरवाडीरून पत्नीसह दोन मुलांना घेऊन घराकडे कार क्रमांक एम.एच१४डी.एक्स.१३०४ ने येत असताना पाटोदा जवळील एका वळणावर भरधाव वेगाततील कारवरचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात पतीचा जागीच मुत्यु झाला आहे.किशोर निवृत्ती सापते वय वर्ष ३२असे मयत झालेल्या तरूणांचे नाव आहे.


आष्टी तालुक्यातील बावी येथील किशोर निवृत्ती सापते हा पत्नी व दोन मुले यांना घेऊन सोमवारी लिंबागणेश येथे सासरवाडीला गेले होते.एक दिवस मुक्काम करून मंगळवारी त्यांनी  चारचाकी कार क्रमांक एम.एच.१४,डी.एक्स.१३०४ ने घेऊन गावाकडे येत असताना पाटोदा येथे एका वळणावर भरधाव वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला ही दुर्दैवी घटना घडली आहे.


 यात कार उलटल्यामुळे झालेल्या अपघातात पती किशोर निवृत्ती सापते वय ३२ वर्ष हा जागीच ठार झाले.तर पत्नी मनिषा व दोन मुले जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली आहे.

धक्कादायक घटना पोलिस अधीक्षकांचे फेसबुक झाले हॅक

https://aplaepaper.blogspot.com/2022/08/blog-post_36.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या