Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आनिनेञी मनीषा रमेश अवचिते याना पंडीत कल्याण गायकवाड यांच्या हस्तेअवार्ड

 

पंडीत कल्याण गायकवाड यांच्या हस्ते आनिनेञी मनीषा रमेश अवचिते यांचा गौरव...

पुणे भोसरी कला क्रीडा मंचच्या वतीने अंकुशराव लांडगे नाट्यगृहात Golden Voice 2022 करा ओके स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड मधील छप्पन्न गायक गायिकांनी सहभाग नोंदवला होता.गणेश वंदनाने यास्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.


 यावेळी सांज ढले गगनतले, सोचेंगे तुम्हे प्यार, गगन सदन तेजोमय, गेला हरि कुण्या गावा,  दिल का आलम, मनाच्या धुंदीत, माना हो तुम बेहद हसी, रुपेरी वाळूत, एक दंताय वक्रतुंडाय, खेळ मांडला, मै निकला, ये जमी गा रही है, इन आखों की मस्ती मै,अशी विविध ढंगी विविध रंगी गाऊन स्पर्धकांनी रसिक प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली,ई टीव्ही मराठी सूर गृहलक्ष्मीचा विजेती ज्योती गोराणे, गायक अक्षय लोणकर गायक रोहीदास माने यांनी परिक्षकांची भूमिका अतिशय चोखपणे पार पाडून योग्य गायकांची निवड केली.

या मध्ये प्रथम क्रमांक:- शुभांगी कंगणे, व्दितीय क्रमांक:- संतोष लांडगे:- तृतीय क्रमांक अनिल झोपे यांनी पटकवला या सर्व विजेत्यांचा सन्मान पं.कल्याण गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 


यावेळी अध्यक्ष नितीन लांडगे, कार्याध्यक्ष विजय फुगे, उपाध्यक्ष भरत लांडगे, नगरसेवक संतोष लोंढे, मा नगरसेवक पंडीतराव गवळी, निवृत्ती फुगे, किशोर गव्हाणे, नंदकुमार दाभाडे, किरण लांडगे, भाऊसाहेब डोळस, सुनंदाताई फुगे, गौरीताई लोंढे विजय लांडगे, दत्ता फुगे संदीप राक्षे, नंदू लोंढे, संजय बेंडे,यशवंत डोळस,शाम लांडगे, सतिश फुगे, मनोज जगताप, बाळासाहेब भालेराव,जीवन फुगे,हे उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसच्या राज्य प्रवक्त्या निकीता बहिरट यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या