Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Beed| धक्कादायक घटना |यां पोलिस अधीक्षकांचे फेसबुक झाले हॅक




धक्कादायक घटना हॅकरने थेट बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनाच आव्हान दिल्याने खळबळ 

सध्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन डिजिटल डाटामुळे अनेकांचे अकाउंट हे हॕक होण्याची  घटना नेहमीच घडते आहे. परंतु एका अधिकाऱ्यांचे अकाउंट हॅक होणे म्हणजे म्हणजे धक्कादायकच आहे. हॅकरने थेट बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनाच आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे वैयक्तिक फेसबुक खाते आहे. त्यांनी ते प्रोफाईल लॉक केलेले आहे. तरीही मात्र, फ्रेंड लिस्टमधील काही लोकांनी मेसेंजरद्वारे पैशांची मागणी हॅकर ने केली आहे.


त्यानंतर ठाकूर यांचा फोटो डीपीवर व्हॉट्सअॅपवर पाठवून पैसे मागितले. सुरुवातीला काहीजण गोंधळले. मात्र, फ्रेंड लिस्टमधील अधिकाऱ्यांनी याबाबत अधीक्षकांशी संपर्क साधला असता ठाकूर यांनी माझा फोटो फेसबुकवर टाकून कुणी पैशाची मागणी केल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका, अशी सूचना केली आहे.


 दरम्यान, सायबर गुन्हेगारांनी एसपींच्या फोटोच्या आधारे आपणच असल्याचे भासवून पैसे मागितल्याने सायबर विभागाने प्राथमिक तपास सुरू केला आहे. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन संबंधित हॅकर सापडण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 


माझा फोटो whatsapp dp मध्ये टाकून  आणि फेसबुक मेसेंजरवर काही मित्रांना मेसेज करुन, पैशांची मागणी केल्याचे समजले. त्यानंतर फेसबुकवर पोस्ट टाकून एक सूचना लिहिली गेली. अद्याप कोणीही पैसे पाठवले नाहीत. संबंधितांचा शोध घेतला जाईल. अशा घोटाळ्यांना कोणीही बळी पडू नये.


नंदकुमार ठाकूर, 

पोलिस अधीक्षक, बीड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या