Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

#Parli | परळीत चमत्कारीक | एक अद्भुत कालराञी देवीचे हे रुप तुम्ही कधीच पाहिले नसेल...तर

 


परळीत चमत्कारीक रुप|एक
अद्भुत कालराञी देवीचे हे रुप तुम्ही कधीच पाहिले नसेल...तर 


#Parli परळीत एक अद्भुत आणि एक जागृत देवी माता कालराञीदेवी




अर्धनारीनटेश्वराच्या रूपात  एकमेव जागृत कालराञी देवी

परळीचे धन्वंतरी प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे पाचवे आहे. बारा ज्योतिर्लिंग जे शिव,शक्ती आणि भक्ती यांचा संगम आहे.अनेक कालखंडात अनेक देवी,देवता, ऋषी-मुनींनी वास्तव्य केलेल्या परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राचा महिमा अनन्यसाधारण आहे. अशीच एक अद्भुत आणि  एक अशी जागृत देवी माता कालराञी देवीची अर्धनारीनटेश्वर रूपातील माहिती परळी वैद्यनाथ पंचक्रोशीतील अभ्यासक गोपाळ आंधळे यांच्या लेखणीतून शारदीय नवराञ उत्सवानिमित्त भाविकांसाठी देण्यात आली आहे. 


#Parli_परळी शहरातील जुन्या गाव परिसरात मांडववेस रोडवर भीमनगर वस्तीत शहराच्या पूर्वेला अर्धनारीनटेश्वराच्या रूपात कालराणी देवीचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. अर्धनारीनटेश्वर हे शिवाचे रूप आहे. शिवाच्या शरीराचा उजवा अर्धा भाग पुरूष आणि डावा अर्धा भाग स्त्रीचा असल्याने त्याला 'अर्धनारी' आणि 'नटेश्वर' असे म्हणतात कारण तो गंधर्ववेदाचा निर्माता आणि नृत्याचा प्रिय एक  पुढे त्याचे नर आणि मादी असे विभाजन झाले, त्यानंतर पुरुषाचे रूप अकरा झाले आणि स्त्रीचे अनेक भाग झाले. 


'अर्धनारीश्वर' ही एक तांत्रिक देवताही आहे. शिव-शक्ती, स्त्री-पुरुष, लिंग-योनी यांचा संयोग हे सृष्टीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच 'अर्धनारिनटेश्वर' असा प्रतीकात्मक अर्थ आहे. 


*हेहीवाचा.. आज परळीत आ.धनंजय मुंडे व सौ.राजश्रीताई मुंडे हस्ते शोभायात्रेचा शुभारंभ*

👇👇👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_80.html*

*हेलीकॅप्टरने होणार पुष्पवृष्टी*

आपला@पेपर*
ब्रेकिंग
*हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी...*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇👇👇👇

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

वेदांताने सोम आणि अग्नी यांनाही विश्वाचे पालकत्व दिले आहे. अर्धनारी, अर्धनारीश, अर्धनारीश्वर इत्यादी अर्धनारीनटेश्वराला पर्यायी नावे आहेत. इसवी सनाच्या सु. पहिल्या शतकापासून अर्धनारीनटेश्वराची अतिशय सुंदर शिल्पे भारतात आढळतात. त्यांची वेरूळ व घारापुरी येथील शिल्पे प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे परळी येथील कालराञी देवीच्या मूर्तीची वैशिष्ट्येही अशीच आहेत. 


समोर दिसणारा मुखवटा (तांदळा) कालराञी देवीचा आहे आणि मुखवटाचा मागील अर्धा भाग लिंग स्वरूपाचा आहे, म्हणजे मागील बाजूस शिवलिंग आहे. कालीमातेचे रूप असलेली कलाराणी देवी ही देवी भागवत पुराणानुसार मानली जाते, या देवीची उत्पत्ती माता पार्वतीपासून झाली असे म्हटले जाते. या देवीची उपासना करणार्‍या भक्ताला अकाली मृत्यूचे भय नसते, तसेच कालराञी देवी ही सर्व सिद्धींची आश्रयदाते आहे. म्हणून तिला शुभंकारी असेही म्हणतात. 



मनुष्याचा भ्रम नष्ट करणारी कालरंती देवी

भ्रम आणि संभ्रम नष्ट करणारी देवी कलाराणी! तिला वेदांमध्ये नाव आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी, त्याच्या मुद्रा अवस्थेत त्याचे रक्षण करण्यासाठी, त्याने मुलाच्या जवळ बसून राञीसूक्तांचे पठण केले, प्राचीन महाकोशल देशाचा राजा विश्वपतीच्या पुत्राचा भ्रम झाला. नंतर ते परळी तीर्थक्षेत्री आले व विधी नुसार विधी केले, त्यामुळे त्यांच्या मुलाचा भ्रम विकार नाहीसा झाला. 


विजया दशमीच्या दिवशी मोठा उत्सव

नवराणीच्या काळात या देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक गर्दी करतात. शहरातील शेकडो भाविक नऊ दिवस या मंदिराची पूजा करतात. विजया दशमीच्या दिवशी या ठिकाणी भव्य दसरा उत्सव होतो. प्रभू वैद्यनाथांची पालखी भगवान वैद्यनाथ कालराणी देवीला साडी आणि चोळी घेऊन येतात. प्रवेश करताच या ठिकाणी वैद्यनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने शोभेची दारू उधळली जाते. या ठिकाणी शहरातील सर्व नागरिक एकत्र जमून सीमोल्लंघन करतात. एकमेकांना पाने देऊन सोने लुटले जाते. नंतर देवी कलाराञी आणि प्रभू वैद्यनाथ भगवान यांची पालखी बटूभैरवामध्ये प्रवेश करते आणि सीमोल्लंघन सोहळा संपन्न होतो. या काल रात्रीच्या जागरात देवीचा भाव जोपासून आपणही आपल्या भ्रामक जगाच्या मोहातून मुक्त होऊ या.


 लेखन #Parli

गोपाळ रावसाहेब आंधळे 

परळी वैद्यनाथ मोबाईल:-9823335439 

e-mailgopalandhale007@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या