Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडेंची परळीच्या काळरात्रीदेवी मंदिर परिसरात स्वच्छता

*अबब...परळीत देवीचे चमत्कारीक रुप|एक अद्भुत कालराञी देवीचे हे रुप तुम्ही कधीच पाहिले नसेल...तर*

👇👇👇👇👇👇👇👇👇
    *संतोष बारटक्के*  *9423472426*



 घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर
पंकजाताई मुंडेंची परळीच्या काळरात्रीदेवी मंदिर परिसरात स्वच्छता







सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत मंदिरासह बौध्दविहार, साठे समाजमंदिर, दर्ग्यात केली स्वच्छता; शांतीवन स्मशानभूमीत वृक्षारोपण


परळी येथे नवरात्र उत्सवास उद्यापासून सुरवात होत असून घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील प्रसिद्ध अशा काळरात्री मंदिरात जाऊन स्वच्छता केली. देवीच्या मंदिराबरोबरच बौध्दविहार, साठे समाजमंदिर, दर्ग्यातही त्यांनी स्वच्छता मोहिम राबवली. भीमनगर भागातील शांतीवन स्मशानभूमीत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ऑक्टोबर या दरम्यान 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून आज शहरात भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या सेवा उपक्रमात पंकजाताई मुंडे स्वतः सहभागी झाल्या.उद्यापासून देवीचा नवरात्रोत्सव सुरू होत आहे


या पार्श्वभूमीवर पंकजाताईंनी काळरात्री मंदिरात जाऊन मंदिर व परिसराची स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता केली.भीमनगर भागातील सुगंध कुटी बौध्दविहार तसेच साठेनगरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिराची त्यांनी स्वच्छता केली. भीमनगर भागातील शांतीवन स्मशानभूमीत जाऊन त्यांनी वृक्षारोपण केले. मलिकपुरा भागात असलेल्या दर्ग्यात जाऊन तिथेही स्वच्छतेची मोहिम राबवली.नांदूरवेस भागात संदीप चौंडे यांनी आयोजित केलेल्या रक्त तपासणी शिबीराचे उदघाटनही त्यांनी केले.  


जनतेसोबत ऐकली 'मन की बात'

महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम पंकजाताई मुंडे यांनी भीमनगर भागात नागरिकांच्या सोबत बसून ऐकला. या सर्व कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, दत्ता देशमुख, प्रकाश जोशी, केशव माळी, डाॅ. शालिनी कराड, जयश्री मुंडे, सुचिता पोखरकर, खालेदराज आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


*Accident | तुळजाभवानीची ज्योत घेण्यासाठी येरमाळा येथे अपघात|बीड जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू* 👇👇👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_54.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या