Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक |हीटरची टाकी फुटून उकळत्या पाणीमुळे झोपलेल्या महिलेचा मृत्यू

Accident |येरमाळा येथे अपघात |बीड जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू* 👇👇👇👇👇👇👇 *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_54.html*




धक्कादायक |हीटरची टाकी फुटून उकळत्या पाणीमुळे झोपलेल्या महिलेचा मृत्यू 


सध्या बाजारात स्वस्त आणि मस्त अशा वस्तूंचा भडीमार सुरू झाला असून अनेकांच्या आयुष्याशी खेळणारे काही व्यापारी या घटनेला जबाबदार आहेत अशा घटना निष्काळजीपणामुळे सुद्धा घडतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे काळजी पूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.



 दिंद्रुडजवळील पिंपळगाव येथे हीटरची टाकी फुटून उकळते पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगाखाली आले. गंभीर जखमी महिलेचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उषा रणजित सुरवसे, वय 31 वर्षे माजलगाव,पिंपळगाव असे मृत महिलेचे नाव असून, 19 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास हीटर चालू करून झोपली होती. रात्री तीनच्या सुमारास उकळत्या पाण्यामुळे प्लास्टिकची टाकी फुटली आणि सर्व उकळते पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगाखाली आले. 



अंबेजोगाई येथील जखमी उषा सुरवसे यांचा रविवारी सकाळी स्वाराती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत उषा सुरवसे यांच्या पश्चात पती, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या