Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आज परळीत आ.धनंजय मुंडे व सौ राजश्रीताई मुंडे यांच्या हस्ते शोभायात्रेचा शुभारंभ | हेलीकॅप्टरने होणार पुष्पवृष्टी







वैष्णोदेवी देखाव्याचे उद्‌घाटन आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते तसेच आ.धनंजय मुंडे व सौ राजश्रीताई मुंडे यांच्या हस्ते शोभायात्रेचा शुभारंभ  होणार आहे 



परळी येथे नाथ प्रतिष्ठान व राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गोत्सव साजरा करण्यात येत असून या निमित्ताने घटस्थापनेला येत्या सोमवार दि 26 सप्टेंबर रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे...घटस्थापनेला परळीत अखंड दिव्य ज्योत शोभा यात्रेवर हेलीकॅप्टरने होणार पुष्पवृष्टी

 या शोभयात्रेचा शुभारंभ बियाणी परिवार यांच्या नाथ टॉकीज परिसरातील निवासस्थानावरून होत असून माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व राजश्रीताई मुंडे यांच्या हस्ते शोभायात्रेचा शुभारंभ होईल नवरात्रीतील नऊ दुर्गांचे स्वरूप आणि वैष्णोदेवी येथून आणलेलली अखंड दिव्य ज्योती  या शोभायात्रेत सहभागी असणार आहे. 



शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या शोभा यात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती  नवरात्र उत्सव मुख्य संयोजक चंदुलाल बियाणी यांनी दिली आहे.



आ.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान व राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या  वतीने न.प.गटनेते वाल्मीक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने औद्योगिक वसाहत परिसरात माता वैष्णोदेवी दर्शन देखावा सादर करण्यात येणार आहे.



 सदरील देखावा परळी येथील राकेश चांडक यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात येत आहे.नवरात्र उत्सवाची सुरुवात सोमवार दि 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने होत असून या पार्श्वभूमीवर बियाणी यांच्या निवासस्थानावरून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दुर्गादेवीची नऊ रुपे नऊ ट्रॅक्टर मधून काढण्यात येत असून वैष्णोदेवी येथून आणलेली अखंड दिव्य ज्योत या शोभयात्रेचे मुख्य आकर्षण आहे . 



पंजाब येथील प्रसिद्ध बँड तसेच पोलीस बँड पथक या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. यासोबतच लेझीम पथक,मोर पथक, संबळ,आराधी,गोंधळी यामध्ये सहभागी होत आहेत.

*हेही वाचा अबब...परळीत देवीचे चमत्कारीक रुप |एक अद्भुत कालराञी देवीचे हे रुप तुम्ही कधीच पाहिले नसेल...तर*

👇👇👇👇👇👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_61.html*

 परळीतील काही शाळा सुद्धा यामध्ये सहभागी होत आहेत. सकाळी 11 वाजता आ.धनंजय मुंडे व सौ.राजश्रीताई मुंडे यांच्या हस्ते शोभा यात्रेचा शुभारंभ होणार आहे सदरील शोभायात्रा अत्यंत आकर्षक व लक्षवेधी करण्यावर आमचा भर असल्याचे मुख्य संयोजक तथा राधा मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगितले,


शोभायात्राचा मार्ग 

नाथ टॉकीज, शिवाजी महाराज चौक ,बस स्थानक ,स्टेशन रोड ,मोंढा ,राणी लक्ष्मी बाई टावर गणेश पार रोड, आंबेवेस ,नांदूर वेस, नेहरू चौक मार्गे ही शोभायात्रा जाणार आहे.


वैष्णोदेवी इथून आणलेल्या दिव्य ज्योती शोभायात्रेवर ठीक-ठिकाणी हेलिकॉप्टर द्वारे फुले उधळण्यात येणार आहेत, दरम्यान सायंकाळी पाच वाजता नवरात्र उत्सवाचे आकर्षण असलेल्या वैष्णोदेवी देखाव्याचे उद्‌घाटन आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे, शोभायात्रा तसेच उद्‌घाटन सोहळ्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य संयोजक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.


*आपला@पेपर*
ब्रेकिंग
*हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी...*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇👇👇👇

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या