Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

चक्क बनावट कागदपत्रांच्या आधारे भरला विमा | पोलिसात गुन्हा दाखल




बनावट कागदपत्रांच्या आधारे  भरला विमा | पोलिसात गुन्हा दाखल


गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे सीएससी केंद्र चालकानेच शेततळ्याचा बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा भरल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. 


अनिरुद्ध सोमेश्वर मुळे यांची मादळमोही येथील गट क्रमांक ६४१ व ०८ मध्ये जमीन आहे.या जमिनीतील पीक विमा भरण्यासाठी अनिरुद्ध मुळे हे सीएससी केंद्रावर गेले होते.परंतु, त्यांचा विमा स्वीकारण्यात आला नाही. 



यानंतर मुळे यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली असता, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या भागातील जमिनीचा विमा कोणी भरला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही मुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सदर जमिनीचा विमा टाकळगाव येथील सीएससी केंद्राचे चालक अण्णासाहेब गव्हाणे यांनी स्वत:च्या नावे केल्याचे निष्पन्न झाले.


 सहायक पोलिस निरीक्षक साबळे, पोलिस जमादार गर्जे, देवडे यांनी पुढील तपास करुन गव्हाणेला सायंकाळी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि साबळे करीत आहेत.

*धक्कादायक |हीटरची टाकी फुटून उकळत्या पाणीमुळे झोपलेल्या महिलेचा मृत्यू*

👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_33.html*

*हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी...*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇👇👇👇

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*
*9423472426*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या