Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Accident |येरमाळा येथे अपघात |बीड जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू

 



#Accident |येरमाळा येथे अपघात|बीड जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू   



आष्टी तालुक्यातील शनिवारी सकाळी नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिरातून ज्योत घेऊन जाण्यासाठी गावातील 50 तरुण भाविक तुळजापूरकडे रवाना झाले होते. यातील एक दुचाकी शनिवारी रात्री येरमाळा येथे अज्ञात वाहनाने उडवून दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. 


आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील तरुण दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवात देवीची प्रतिष्ठापना करतात. यासाठी तुळजापूर येथून तुळजाभवानी मातेची ज्योत आणण्याची प्रथा आहे. सोमवारी घटस्थापना असल्याने शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गावातील 50 तरुण भाविक दुचाकी, टेम्पो, पिकअपमधून ज्योत आणण्यासाठी तुळजापूरकडे रवाना झाले. 


या भाविकांमध्ये महेश भोसले वय ३१, अमोल खिलारे वय ३८ हे दोघे दुचाकीवर होते. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास येरमाळाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात भोसले आणि खिलारे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भोसले हे आरोग्यसेवक तर अमोल खिलारे हे उपसरपंच होते. दोन तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


*धक्कादायक |हीटरची टाकी फुटून उकळत्या पाणीमुळे झोपलेल्या महिलेचा मृत्यू*

👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_33.html*

*हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी...*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇👇👇👇

*join WhatsApp group:*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या