Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED |अज्ञात वाहनाच्या अपघातात |एकाचा जागीच मृत्यू

 


BEED |अज्ञात वाहनाच्या अपघातात |
एकाचा जागीच मृत्यू  

बीड येथे धुळे-सोलापूर महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौका जवळ दि ९सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान रस्त्याने पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला वाहनाने उडवल्यामुळे त्याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. मयत सूर्यकांत केशवराव 40 वर्ष राहणार पाली जिल्हा बीड असे मयताचे नाव आहे


हा अपघात घडलाची माहिती मिळतात तात्काळ पोलिसांनी धाव घेऊन या मार्गावरील वाहतूक बंद करून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अधिकारी बाहेर होते. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष साबळे,सहायक निरीक्षक योगेश उबाळे,उपनिरीक्षक देविदास आवारे,हवालदार पीटी चव्हाण, आनंद मस्के यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

मृतदेहावरून वाहने जाऊ नयेत म्हणून वाहतूक एकेरी करण्यात आली. रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे

.*हेही बातमी वाचा...बीडचे थेट पाकिस्तानशी कनेक्शन |12 कोटी रुपयांच्या बँक व्यवहार उघड*

*आपला@पेपर*

*हेडलाईन्स न्यूज*

*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/beef-12.html*


*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या