Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'या' महाविद्यालयाचे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विशेष आवाहन..



सौ.के.एस.के.(काकु)अन्नतंत्र महाविद्यालयाचे आवाहन..

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनो अन्नप्रक्रिया अभ्यासक्रमामध्ये पदवीधर व्हा...

बीड येथे आयएमएआरसी या मार्केट रिसर्चमध्ये काम करत असलेल्या कंपनीच्या अहवालानुसार २०२२ ते २०२७ दरम्यान देशातील अन्न प्रक्रिया उद्योगाची वार्षिक वाढ १० ते ११ टक्के वेगाने होणार आहे. सरकारही अन्न प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे.

 याक्षेत्रात होणारी वाढ लक्षात घेता पुढील पाच वर्षांत अधिकाधिक तज्ञ मनुष्यबळाची व स्वयंउद्योगांची  गरज भासणार आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनो भविष्यातील संधीचे सोने करण्यासाठी अन्नप्रक्रिया तसेच कृषि क्षेत्रातील अभ्यासक्रमामध्ये पदवीधर व्हा असे आवाहन सौ.के.एस.के.(काकू)अन्नतंत्र व कृषि महाविद्यालय म्हसोबा फाटा, नगर रोड,बीड महाविद्यालयाचे सहसचिव डॉ.जी.व्ही.साळुंके यांनी केले आहे.

अन्न प्रक्रियेद्वारा विविध प्रकारची पेये,चुर्ण आणि ठोस पदार्थ बनवता येतात.प्रक्रिया केलेले पदार्थ, धान्यापासूनचे पदार्थ,मसाले, जाम ,जेली पॅकेज फुड,लोणचे यांसारखे व्यवसाय याद्वारे सुरू करता येतात.शिवाय फळे, भाजीपाला,दुध, चाॅकलेट्स , सोयाबीनचे पदार्थ यांसारख्या  व इतर अनेक उद्योगांचा समावेश अन्न प्रक्रिया क्षेत्रात होतो. 

अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये लहान प्रमाणापासुन ते अगदी कोट्यवधींची उलाढाल असणारा व्यवसाय निर्माण करणे शक्य आहे.व्यवसायाची उत्तम माहिती घेऊन,नक्की कोणते उत्पादन घ्यायचे आहे,ते ठरवुन तसेच शासनाची मदत याद्वारे  अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी अन्न प्रक्रिया क्षेत्रातील बी.टेक. अन्न तंत्रज्ञान विषयात पदवी प्राप्त करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.के.एस.के.(काकू) अन्नतंत्र व कृषि महाविद्यालय, म्हसोबा फाटा, नगर रोड, बीड येथील महाविद्यालयाचे सहसचिव डॉ. जी. व्ही. साळुंके यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रियामध्ये ज्ञान तसेच कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रवेश घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या