Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीजवळ स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

 महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार 

https://aplaepaper.blogspot.com/2022/08/blog-post_17.html

PARLI-BEED,

परळीजवळ
स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

परळी औष्णिक विद्युत केंद्राजवळ जिलेटिन टाकून स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना आज रोजी परळी पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांकडून जिलेटिनच्या 103 काठ्या, 150 बॅटरी आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

या घटनेमुळे परळीमध्ये खळबळ उडाली आहे.

परळीत या राखेमुळे नुकताच एका चिमुकलीचा बळी गेला असताना या राखमाफीयांमुळे परळी धोक्यात आली आहे

*हेही बातमी वाचा परळीत चिमुरडीचा राखेच्या साचलेल्या पाण्यात पडून मृत्यू* 

*https://aplaepaper.blogspot.com/2022/08/blog-post_40.html*


अतिसंवेदनशील परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात राख माफियांकडून राख गोळा करण्यात येत असून ही राख चोरण्यासाठी वीज केंद्राजवळ स्फोट घडवण्यासाठी आलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यातिघांकडून जिलेटिनच्या 103 काठ्या,150 बॅटरी आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. राख गोळा करणाऱ्या राख माफियांकडून औष्णिक वीज केंद्राजवळ ब्लास्टिंग करून राख काढली जात होती.

शुक्रवारी संध्याकाळी असाच स्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. आता पोलिसांनी या तिघांना परळी पोलिसांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या