Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महत्वपूर्ण बातमी..|वाढदिवस चौका चौकात साजरा करणाऱ्यांसाठी


आज फॅशन म्हणून कोणत्याही चौकात वाढदिवस व शंभर रुपयाचा केक घेऊन भर रस्त्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या किंवा गल्लोगल्ली वाढदिवस साजरा करून वायफळ खर्च करणाऱ्यांसाठी चांगला संदेश देणारी ही घटना आहे.महत्वपूर्ण बातमी..|वाढदिवस चौका चौकात साजरा करणाऱ्यांसाठी आहे. 



कोणत्याही शासकीय योजनेची वाट न पाहता त्यांनी स्वखर्चाने गावात ४८ विजेच्या खांबांवर पथदिवे लावले.यासाठी सुमारे 1 लाख 25 हजार रुपये खर्च आला. आज सुहासच्या वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिर परिसरात लोकार्पण सोहळा पार पडला अख्या गावात उजेड पडला...


माजलगाव तालुक्यातील नाखलगाव येथील तरुणाचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत ग्रामस्थांच्या चांगलीच लक्षात येत आहे. हे गाव सतत विविध कामांसाठी नेहमीच चर्चेत असते. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून गावात पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.

 हा प्रश्न सोडवण्याचा विचार सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रमेश झोडगे यांच्या डोक्यात सुरू होता काही दिवसांपूर्वीच रमेशने आर्थिक गणित मांडले की त्याच्या पुतण्याच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण गावात थेट एलईडी बसवण्यात आल्या....

 या वेळी पांडुरंग झोडगे,सरपंच विठ्ठल गवळी,रामहरी शिनगारे, लक्ष्मण सोळंके,भागवत शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण गाव याएलईडी दिव्यांनी उजळून निघाल्याने पंचक्रोशीत झोडगे परिवाराचे कौतुक होते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या