Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत चिमुरडीचा राखेच्या साचलेल्या पाण्यात पडून मृत्यू




परळीत चिमुरडीचा राखेच्या साचलेल्या पाण्यात पडून मृत्यू 

परळी गंगाखेड रोडवरील पांडे पेट्रोल पंपामागे असलेल्या राख तलावापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर राहणाऱ्या पवार कुटुंबातील तीन भावंडे राखेच्या तलावाच्या पाण्यात खेळत होती.राख तलावापासून त्यांचे घर 100 मीटर अंतरावर आहे. सकाळी ही मुले खेळण्यासाठी या तलावावर गेली. या तीन मुलांपैकी साक्षी साईनाथ पवार या चार वर्षांच्या मुलीचा खेळताना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राख तलावापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर राहणाऱ्या पवार कुटुंबातील तीन भावंडे राखेच्या तलावाच्या पाण्यात खेळत होती. त्या ठिकाणी साक्षी आणि तिची दुसरी बहीण या पाण्याच्या डबक्यात खेळू लागल्या. खेळता खेळता ते पाण्यात पडले. त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या त्याच्या सात वर्षांच्या मोठ्या भावाने ही घटना पाहिली आणि आई-वडिलांना सांगण्यासाठी धाव घेतली. 

साक्षीच्या वडिलांनी घटनास्थळी पोहोचून तिला पाण्यातून बाहेर काढण्यापूर्वीच चार वर्षांच्या साक्षीचा मृत्यू झाला. एका मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या