Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जय मल्हार शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी

 *ब्रेकिंग न्यूज परळीजवळ स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/08/blog-post_28.html*



हेळंब सेवा सोसायटीवर सौ.पंकजाताई मुंडेंच्या पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

पंकजाताईंनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन

परळी तालुक्यातील हेळंब सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या जय मल्हार शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे.

भाजप प्रणित पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. 

हेळंब सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी आज निवडणूक झाली.  पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार शेतकरी विकास पॅनलने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवला.  

यानिवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे - लक्ष्मण आंधळे, रामराव पवार, तुकाराम पाळवदे, यशवंत पाळवदे, प्रभू राठोड, काशीनाथ होळंबे, माधव होळंबे, व्यंकटी होळंबे, नानासाहेब होळंबे, सुरेखा आंधळे, सुनिता होळंबे, राधाकिसन घुले, गोविंद इंचके

 पॅनलच्या विजयासाठी पॅनल प्रमुख माधवराव होळंबे, मोहन होळंबे सरपंच राम पाळवदे उपसरपंच व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सर्व विजयी उमेदवारांचे सौ.पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या