Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जवळ भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू |

 


बीड जवळ भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू |



भरधाव कारने समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले.ही धक्कादायक घटना बीड-परळी रस्त्यावरील मौजे येथे आज दि 28  रोजी ऑगस्ट दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुण दुचाकीवरून एमएच 44 ई-9852 बीडहून वडवणीकडे जात होते, तर एक कार एमएच 04 जीडी-4605 वडवणीहून बीडकडे जात होती. कृष्णा सतीश दाभाडे व तीस वर्ष राहणार शहाजानपूर रामकिशन भगवान दाभाडे व 36 राहणार शहाजानपूर तालुका माजलगाव अशी मृतांची नावे कळली असून प्राथमिक माहितीनुसार पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे

मौज शिवारात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.यामध्ये दुचाकीवरील 25 ते 30 वयोगटातील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. 

अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून कारचेही नुकसान झाले आहे.दरम्यान,अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेतली. कारचा चालक जखमी झाला असून त्याला बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंपळनेर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी धाव घेऊन कार ताब्यात घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मृतांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या