Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भीषण अपघात अहमदपूर-अंबेजोगाई रस्त्यावर ; बुलेटस्वार तरुण जागीच ठार

 आपला ई पेपर online 


अहमदपूर-अंबेजोगाई रस्त्यावरील भागीरथी फार्म हाऊस जवळ आज सायंकाळी कार आणि बुलेटचा भीषण अपघात झाला. या अपघातात बुलेटस्वार तरुण जागीच ठार झाला असून कारचालक जखमी झाला आहे.

ही घटना दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम गोपाळ मुंढे (वय अंदाजे २५ वर्ष रा. गुट्टेवाडी, ता. परळी जिल्हा बीड) हा तरुण आपल्या एम एच २० बि आर ११०० बुलेटवरून अहमदपूरकडून आपल्या गावी गुट्टेवाडीकडे जात होता. त्याच वेळी किनगाव बाजूकडून अहमदपूरकडे येणाऱ्या ह्युंदाई कंपनीची एमएच ४४ झेड ६८४४ क्रमांकाच्या 'व्हेन्यू' कारची आणि बुलेटची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहने रस्त्याखाली सुमारे २० फूट अंतरावर असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात शुभम मुंढे याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कारचालक/मालक भागवत माणिकराव गायके वय ४६ वर्ष रा पुस ता अंबेजोगाई हे देखील या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी तत्परता दाखवत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास राठोड व पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत आरदवाड यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य राबवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

या भीषण अपघाताची नोंद अहमदपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण झाला असून, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहेत.