नंदागौळ येथे पुन्हा तीन ठिकाणी चोरी,दुचाकीसह रोकड घेऊन चोरटे पसार !
एवढया मोठ्या प्रमाणात चोरी होऊन पोलिसांकडून रात्रीची गस्त का घातली जात नाही ? नागरिकांचा सवाल !
नंदागौळ येथे मागील 7 महिन्यात झालेल्या चोरीच्या घटनांचा तपास विशेष तपास पथका मार्फत करावा - सुंदर गित्ते
आपला ई पेपर परळी/प्रतिनिधी
परळी तालुक्यातील नंदागौळ येथे मागील 7 महिन्यात तिसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे तर या 45 दिवसात दुसऱ्यांदा चोरी झाली आहे मागील वेळी 3 तर यावेळी सोमवारी 11 मे 2026 रोजी रात्री 12 च्या सुमारास 3 ठिकाणी चोरी केली असून एका ठिकाणी मोटारसायकल नेताना घरातील व्यक्ती जागे झाल्याने चोर पसार झाले आहेत.
रात्री चोरी होणार दुसऱ्या दिवशी सकाळी 8 - 9 वाजता येऊन पोलीस पाहणी व पंचनामा करणार आणि अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल होणार या पलीकडे पोलीस प्रशासनाकडून काहीही न झाल्याने मागील 7 महिन्यातील चोरीचा तपास न लागल्याने चोरांची हिंमत वाढली आहे.
त्यात पोलिस प्रशासनाचे बिट अंमलदार यांनी इतर कर्मचाऱ्यांना घेऊन त्यांच्या नियुक्ती पासुन एकदाही रात्रीची गस्त घातली नाही याचे आश्चर्य व्यक केले जात आहे,दरम्यान या चोरीच्या घटनेमुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर गावातील नागरिक भयभीत झाले आहेत,पोलीस प्रशासनाला चोरांना शोधून जेरबंद करण्यात अपयश आल्याने वारंवार नंदागौळ या गावातच चोरीच्या घटना घडत आहेत.
त्यामुळे मागील 7 महिन्यात झालेल्या सर्व चोरीच्या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेबांनी विशेष पथका मार्फत करून चोराना जेरबंद करण्याची मागणी नंदागौळचे सरपंच सुंदर गित्ते यांनी केली आहे.


Social Plugin