Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत धक्कादायक घटना| जेवण करताना घास घशात अडकून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

आपला ई पेपर परळी /प्रतिनिधी बाबा शेख


प्रवासादरम्यान जेवण्यासाठी थांबले असताना, अन्नाचा घास घशात अडकून एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परळी-अंबाजोगाई रस्त्यावर घडली आहे. संबंधित कर्मचारी हे जिल्ह्याबाहेर कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलीस कर्मचारी परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील एका धाब्यावर जेवणासाठी थांबले होते. जेवत असताना अचानक अन्नाचा घास घशात अडकल्याने त्यांना तीव्र ठसका लागला व उलट्या सुरू झाल्या. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. खबर देणारे फिर्यादी

धनंजय रामरावजी गुजर वय 47 वर्षे व्यवसाय - खाजगी नौकरी, रा. भारसवांडा, ता. आष्टी, जि. वर्धा, ह.मु. चारोली पुणे यांच्या खबरीवरून

मयत - देवेन्द्र रामरावजी गुजर वय 50 वर्षे रा. आर्वी, ता. आर्वी, छातीत दुखु लागल्याने

वरील तारीख वेळ व ठिकाणी यातील खबर देणार यांचा भाऊ नामे देवेन्द्र रामरावजी गुजर वय -1 55 वर्षे रा.आर्वी, ता.आर्वी, जि. वर्धा हा जेवन करत असताना छातीत दुखु लागल्याने मयत झाला आहे. वगैरे मजकुराचे खबरेवरुन सदर आ.मृ. मा.पो.नि.सो यांच्या आदेशाने दाखल पुढील तपासकामी सफौ/204 टोले यांच्याकडे देण्यात आला.

दाखल करणारे अंमलदार पोह/448 तोटेवाड पोस्टे परळी ग्रामीण मो. नं. 

चौकशी करणारे अंमलदार सफौ/204 टोले पो स्टे परळी ग्रा.मो.नं 

प्रभारी अधिकारी - पो.नि. सय्यद सो पो स्टे परळी ग्रा.मो.नं. 8

मृतदेह शवविच्छेदनासाठी परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.परळी ग्रामीण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

एका कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याचा अशा आकस्मिक निधनाने पोलीस दलासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.