आपला ई पेपर online अंबाजोगाई
पुणे येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात सैन्यात नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून १० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला वडवणी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
पवन भिवा भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता.
१३ फेब्रुवारी २०२५ रोजी सीताराम बडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आरोपींनी बडे यांच्या भावाला नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन १० लाख रुपये उकळले होते आणि बनावट सही-शिक्क्याचे नियुक्तीपत्रही दिले होते. वडवणी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे परंडा पोलिसांच्या मदतीने १४ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचून आरोपीला त्याच्या गावातून अटक केली.
न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुशिक्षित तरुणांनी सरकारी नोकरीच्या अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी केले आहे.


Social Plugin