Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

केज | भीषण अपघातात तसीलदार यांचा जागीच मृत्यु


 केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती मृत्यू; तालुक्यात शोककळा 

 केज, दि. ९ : केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज गुरुवार रोजी सकाळी लातूर–अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

रेणापूर फाट्याजवळ ही घटना घडल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतः कार चालवत प्रवास करत होते. दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली आणि गंभीर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघातावेळी ते वाहनात एकटेच असल्याचे सांगितले जात आहे. माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 

त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या राकेश गिड्डे यांच्या आकस्मिक निधनामुळे महसूल विभागासह केज तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.




सविस्तर वृत्त , लिंक वर क्लिक करा