Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या: अकॅडमी संचालकांसह तिघांवर गुन्हा दाखल

 

आपला ई पेपर बीड online 


पुण्यातील हंडेवाडी येथील यशोतेज अकॅडमीमध्ये एनडीए परीक्षेची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय अवधूत उल्हास बडे या विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याप्रकरणी पाच महिन्यांनंतर संस्थेच्या संचालकांसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फुरसुंगी पोलिसांनी अकॅडमीचे संस्थापक तेजस पाटील, सीईओ विकास पाटील आणि वॉर्डन वसंत सरकटे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०६ आणि ३(५) अन्वये कारवाई केली आहे. मूळचा बीडचा रहिवासी असलेल्या अवधूतने १० नोव्हेंबर २०२५ रोजी अकॅडमीच्या वसतिगृहात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती.

तपासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार, अवधूतवर पैसे चोरीचा आरोप करून वॉर्डनने त्याला रस्टीकेट करण्याची धमकी दिली होती. या मानसिक दबावामुळे आणि संस्थेच्या हलगर्जीपणामुळे हा हृदयद्रावक प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याचे योग्य समुपदेशन न करणे आणि पालकांना घटनेची वेळेत कल्पना न देणे या गंभीर बाबी फिर्यादीत नमूद करण्यात आल्या आहेत. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कठोर कारवाई केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सविस्तर बातमी: https://viveksindhu.com/beed-student-commits-suicide-in-pune/