आपला ई पेपर | परळी प्रतिनिधी
अशोक खरात यांच्या संपर्कातील बुवा बाज 39 आमदारांनी राजानामे द्यावेत या प्रमुख मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परळी येथे निदर्शने करण्यात आली.
अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा या प्रमुख मागणीसाठी व बुवाबाजी व भोंदु गिरी विरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवावा या उद्देशाने सोमवारी ता 6 दुपारी एक वाजता परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. नाशिक येथील भोंदु अशोक खरात यांनी महिलांचे लैंगिक शोशन केले आहे.
महिलांच्या न्याय देण्यासाठी असलेले महिला आयोग भोंदु अशोक खरात यांच्या पायाशी लोळण घालत आहे. यांच्या सह संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या विरूद्ध गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी माकप च्या परळी शाखेनी परळी वै येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत निदर्शने केली.
या आंदोलनाचे नेतृत्व सिटु चे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे, माकपचे जेष्ठ नेते कॉ पी एस घाडगे, कॉ पांडुरंग राठोड, माकपचे शाखा सचिव कॉ किरण सावजी, कॉ सुवर्णा रेवले, कॉ जालिंदर गिरी, कॉ प्रकाश चव्हाण कॉ अशोक मस्कले, आशा संघटनेच्या आशा लांडगे, हेमा काळे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.


Social Plugin