Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

* ऐन उन्हाळ्यात महिलेला नळ कनेक्शन पाण्यासाठीची वणवण थांबली ; डोळ्यात आनंदाश्रू

परळीतील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठ्यासाठी कायम कटीबद्ध-पाणी पुरवठा सभापती सौ. जयश्रीताई रवींद्र गित्ते 




आपला ई पेपर/परळी प्रतिनिधी

 गेल्या चार वर्षांपासून दररोज पाण्यासाठी वणवण करणाऱ्या सौ. स्वामीबाई यांच्या आयुष्यात अखेर दिलासा मिळाला आहे. जलालपूर मथुरानगर, श्री पशुपतीनाथ मंदिर परिसरात राहणाऱ्या स्वामीबाईंनी आपल्या पाण्याच्या तीव्र समस्येबाबत नगरसेविका तथा नगर परिषद पाणी पुरवठा सभापती सौ. जयश्रीताई रवींद्र गित्ते व साईभक्त उद्योजक रवींद्र गित्ते यांची भेट घेतली. उन्हातान्हात पाण्यासाठी होणारी धावपळ, रोजची कसरत आणि अनेक ठिकाणी फिरूनही न सुटलेला प्रश्न त्यांनी मांडला. या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत, सभापती सौ.जयश्रीताई गित्ते यांनी स्वतः पुढाकार घेत सौ.स्वामीबाई यांच्या घरापर्यंत पाईपलाईन टाकून नळ कनेक्शन उपलब्ध करून दिले.


आज त्यांच्या घरातून वाहणारे पाणी हे केवळ पाणी नसून — तो आहे दिलासा, आनंद आणि नवजीवनाचा प्रवाह. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि डोळ्यांतील आनंद हेच या कार्याचे खरे यश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.  “परळीतील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत,” असे नगर परिषद पाणी पुरवठा सभापती सौ. जयश्रीताई गित्ते यांनी सांगितले. 

        

शहरातील प्रभाग क्र. ११ मधील जलालपूर मथुरानगर, श्री पशुपतीनाथ मंदिर परिसरात राहणाऱ्या सौ. स्वामीबाई यांच्या गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्न तात्काळ सोडविला आहे. नगरसेविका तथा नगर परिषद पाणी पुरवठा सभापती सौ. जयश्रीताई रवींद्र गित्ते तसेच साई भक्त उद्योजक रवींद्र गित्ते यांची भेट घेऊन आपल्या अडचणीचे सांगितले होत्या. सदर बाबीची गांभीर्याने दखल घेत. स्वामीबाई यांच्या घरापर्यंत पाईपलाईन टाकून हे काम पूर्ण करण्यात येऊन त्यांना नळ कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येतून त्यांची सुटका झाली आहे. यावेळी सौ. स्वामीबाई यांनी शासनाच्या घरकुल योजनेसाठी अर्ज केल्याची माहिती दिली. त्यावर सभापती सौ. जयश्रीताई गित्ते यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून हा प्रश्नही प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले.

परळी वैजनाथ शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छ, नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हे नगर परिषदेचे प्राधान्य असून, त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सभापती सौ. गित्ते यांनी सांगितले. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या घरकुल, रस्ते, पाणीपुरवठा व नाल्यांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.     

तसेच श्री पशुपतीनाथ मंदिर परिसरातील हायमास्ट वीज व्यवस्था, सभागृह सुविधा तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठीही प्रशासन कटिबद्ध असून, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उद्धव आघाव, होळबे, भागवत मुंडे, स्वामी व या परिसरातील नागरिक उपस्थित होते.