परळी प्रतिनिधी/आपला ई पेपर
जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी परळी येथे ‘कोण ठरणार परळीची माँसाहेब जिजाऊ’ या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन माऊंट लिटरा झी स्कूल, बचपन प्ले स्कूल, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अकॅडमी आणि क्रिएटिव्ह किड्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत महिलांसाठी निबंध स्पर्धा, रंगोळी चित्र स्पर्धा, जिजाऊ विषयावर प्रश्नमंजुषा, शिवसंस्कार व जिजाऊ कथा सादरीकरण तसेच ‘ओळखा पाहू – फोटो आणि आवाज ओळखा’ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सर्व स्पर्धांमधून जिंकलेल्या सर्व स्पर्धकांची मल्टी टॅलेंट स्पर्धा देखील होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी एअर फ्रायर, डिनर सेट, मिक्सर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, गॅस शेगडी अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून सर्व स्पर्धा मोफत आहेत. इच्छुक महिलांनी १३ मार्च २०२६ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Social Plugin