सखारामजी नाईक महाविद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा यल्लावाड हिची निवड
आपला ई पेपर/online/परळी प्रतिनिधी
परळी तालुक्यातील वसंतनगरच्या उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा राजकुमार यल्लावाड हिची महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड परीक्षेत यश संपादन केल्यामुळे तिची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी संपूर्ण राज्यातून केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये परळीतील समीक्षा राजकुमार यल्लावाड हिचा समावेश झाल्याने तिच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे
समीक्षा यल्लावाड ही उच्च माध्यमिक आश्रम शाळा, वसंतनगर येथे शिक्षण घेत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय राठोड, सचिव रामेश्वर राठोड,महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण पवार, माजी सरपंच डी एस राठोड, सरपंच विजय राठोड यांच्यासह प्रा.नागरगोजे सर, प्रा.देशमुख सर, प्रा.सुरनर सर, प्रा.परळीकर, प्रा.आगरे, प्रा.जाधव,सर प्रा.मोरे सर, स्वामी सर, गीते सर,राम राठोड सर ( प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक) कै.लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजयजी देशमुख, सचिव रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रसादजी देशमुख, प्राचार्य डॉ. विद्या देशपांडे, तसेच दोन्ही महाविद्यालयांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार व पालकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय परीक्षेत विज्ञान, तंत्रज्ञान, सामान्यज्ञान, तार्किक क्षमता व बौद्धिक कौशल्यावर आधारित प्रश्नांचा समावेश होता. या कठीण परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत समीक्षा यल्लावाड हिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. इस्रोच्या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, रॉकेट प्रक्षेपण प्रक्रिया तसेच वैज्ञानिक प्रयोगशाळांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.
या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून, भविष्यात अंतराळ विज्ञान क्षेत्रात कार्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली आहे. समीक्षा यल्लावाड हिच्या पुढील शैक्षणिक व वैज्ञानिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Social Plugin