धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया.... केंद्रीय अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये पायाभूत सुविधा, शेती, महिला आणि युवक यांच्यावर लक्ष केंद्रित करून समावेशक विकासाचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे.
विक्रमी पायाभूत गुंतवणुकीचा महाराष्ट्राच्या औद्योगिक, कृषी व दळणवळण क्षेत्राला मोठा लाभ होईल. शेतीत उत्पादनक्षमता व प्रक्रिया उद्योगांवर दिलेला भर शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस पूरक ठरेल.
महिलांसाठी स्वयंरोजगार व आर्थिक समावेशनाच्या उपाययोजनांमुळे गरीब व मध्यमवर्गीय महिलांना नवी संधी मिळेल, तर युवकांसाठी कौशल्य विकास व स्टार्ट-अप्समुळे रोजगारनिर्मितीस चालना मिळेल.
हा अर्थसंकल्प केंद्र-राज्य समन्वयातून प्रभावीपणे राबवला तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास वाटतो
धनंजय मुंडे


Social Plugin