आपला ई पेपर/परळी प्रतिनिधी
परळी वैजनाथ येथील रहिवासी, सामा
जिक धार्मिक कार्यात सक्रिय कार्यकरत होते विष्णुअप्पा वामनअप्पा जुजगर (वय ७८) यांचे अंबाजोगाई येथे अल्पशा आजाराने आज रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी आज रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक २.०० वाजता अंबाजोगाई येथे करण्यात आला. तसेच राख साठवण्याचा विधी मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी 7.00 वाजता बोरुळ तलाव अंबाजोगाई येथे होणार आहे.
स्व. विष्णुअप्पा जुजगर हे समाजहिताची जाण ठेवणारे, धार्मिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे व सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले वामन जुजगर व संतोष जुजगर, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार संतोष जुजगर यांचे वडील होत.


Social Plugin