Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत समविचारी पक्षांना सोबत घेवुन प्रभागातील उमेदवार घोषीत करणार- सय्यद हनिफ

परळी नगरपालिका अध्यक्षपदाचा पहिला उमेदवार कॉंग्रेसचा घोषीत 

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


परळी नगरपालिका निवडणुकीत भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस मधील बडे नेते उमेदवारी घोषीत करण्यासाठी पुढे येत नसताना कॉंग्रेसने शनिवार दि.१५ रोजी पत्रकार परिषद घेवुन नगराध्यक्ष पदासाठी मैमुना बेगम सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांच्यख उमेदवारीची घोषणा करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.प्रभागातील सदस्यांच्या उमेदवारी अंतिम टप्प्यात असून लवकरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्व उमेदवारांच्या घोषणा करणार असल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांनी सांगितले.

 परळी शहरात शनिवारी सायंकाळी प्रदेश उपाध्यक्ष अनिल मुंडे, तालुकाध्यक्ष प्रकाश मुंडे,शहर सरचिटणीस शशिशेखर चौधरी आपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी,प्रकाश देशमुख यांची पत्रकार परिषद झाली.यावेळी बोलाताना बहादुरभाई यांनी सांगितले की.आम्ही महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणुन लोकसभा निवडणुकीत बजरंग सोणवणे यांच्या प्रचाराची धुरा अग्रक्रमाने सांभाळत शहरातील ३० पैकी २८ बुथवर मताधिक्य दिले होते.विधासभा निवडणुकीत आमचा उमेदवार आयात करत तुतारी चिन्ह दिले तरी आम्ही प्रचाराची धुरा सांभाळली.परळी नगरपालिकेच्या अध्यक्षपदावर कॉंग्रेसचा हक्क असल्याने महाविकास आघाडी म्हणुन शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,माकप अशा पक्षांच्या स्थानिक पदाधिकार्यांची दि.२६ ऑक्टोबर रोजी बैठक घेतली.यानंतर आम्ही पुढाकार घेत आमच्यापेक्षा अधिक सक्षम उमेदवार असेल तर त्यावर विचार करु असेही ठरले.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची वेगळी चुल मांडण्याची तयारी सुरु झाली आणि त्यांनी आपल्या पक्षातील पदाधिकार्यास अध्यक्षपदासाठी पुढे करण्याऐवजी ज्या व्यक्तीने २०११ साली नगराध्यक्षपद भुषवुन परळीचे वातावरण गढुळ करणार्या व्यक्तीच्या खांद्याला खांदा लावुन काम केले.काही महिन्यापर्यंत त्या नेत्याचा उदोउदो करत आले आणि अचानकपणे शहरात अपक्ष उमेदवारी जाहिर करुन प्रचाराच्या कामाला लागलेल्या व्यक्तीचे कपडे बदलुन महाविकास आघाडीत आणल्यानंतर त्यास आम्ही कडाडून विरोध केला.परळी शहरातील जनता भ्रष्टाचार, गुंडागर्दी याला कंटाळलेली असुन शहराच्या विकासासाठी आम्ही कॉंग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीकडुन  उमेदवार देत पुर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे सय्यद हनिफ यांनी सांगितले.