Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिरसाळा येथे होणार अभूतपूर्व शेतकरी संवाद मेळावा!


केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती; हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार

नियोजनासाठी गावोगावी बैठका; कृषीकुल येथे अनेक गावांच्या सरपंचांची नियोजन बैठक

आपला ई पेपर परळी वैजनाथ प्रतिनिधी

ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांच्या प्रेरणा आणि संकल्पनेतून दिनांक 07 नोव्हेंबर रोजी सिरसाळा येथे भव्य शेतकरी संवाद मेळावा संपन्न होत आहे. या कार्यक्रमास देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री पंकजाताई मुंडे, खा.बजरंग सोनवणे, खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व आमदारांसह अनेक मान्यवर उपस्थित असतील. सदरील कार्यक्रमास राज्यातील 35 ते 40 हजार शेतकरी उपस्थित राहणार आहेत. नियोजनासाठी गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका होत असून, परळी तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंचांची कृषीकुल येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.


सिरसाळा येथे ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी संवाद मेळाव्याची तयारी पूर्णत्वास आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणीच भव्य कृषी प्रदर्शनही भरवण्यात येत असून, कृषी क्षेत्राशी संलग्न असलेल्या आस्थापनांचे शंभर स्टॉल उभारण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा ठरणार आहे. केळी लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून शंभर कोटी, तुती लागवड करण्यासाठी शंभर कोटी तर फळबाग लागवडीसाठी शंभर कोटी रुपयांची मदत आर्थिक संस्थेच्या मार्फत शेतकऱ्यांना करण्याची घोषणा केली जाणार आहे. पारंपरिक शेती ही शेतकऱ्यांना न परवडणारी झाली आहे. या दुष्टचक्रातून बाहेर निघायचे असेल तर फळबाग लागवडीसारखा शाश्वत उपाय करावा लागणार आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वाटचाल करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, शासन, प्रशासन आणि शेतकऱ्यांत सुसंवाद घडवणे तसेच आधुनिक शाश्वत शेतीसाठी भविष्यकालीन ठोस उपाययोजनांचा ऊहापोह या मेळाव्यात केला जाणार असल्याने हा शेतकरी संवाद मेळावा अभूतपूर्व ठरणार असून, या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


*नियोजनासाठी गावोगावी बैठका*

सिरसाळा येथील शेतकरी संवाद मेळाव्यास केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत असून त्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने गावोगावी बैठका होत आहेत. नियोजन बैठकांना शेकडोंच्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित राहत असून, शेतकरी संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा ठाम निर्धार करीत आहेत. या कार्यक्रमात अनेक प्रगतशील शेतकरी तसेच विकसनशील गावांचा सन्मानही करण्यात येणार आहे.


अभूतपूर्व शेतकरी संवाद मेळावा

मराठवाडा हा सर्वाधिक दुष्काळी प्रदेश म्हणून गणल्या जातो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळा सतत पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळली आहे. आर्थिक संकटात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे मार्ग पत्करले. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे, त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे, त्यांच्यातील हरवलेला आत्मविश्वास पुन्हा नव्याने जागवला पाहिजे हा या शेतकरी संवाद मेळाव्याचा प्रमुख उद्देश असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना ग्लोबल विकास ट्रस्टकडून तयार करण्यात आल्या असून त्यांचीही घोषणा याच कार्यक्रमात होणार आहे. त्यामुळे हा अभूतपूर्व व भुतो न भविष्यती असा शेतकरी संवाद मेळावा होणार आहे. या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.