मलूकपीठाधीश्वर पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह शेकडो साधु संतांचे बुधवारी परळीत आगमन
आपला ई पेपर परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी)
गोदावरी परिक्रमा यात्रेनिमित्त बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री मलूकपीठाधीश्वर पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह शेकडो साधु संतांचे बुधवारी परळीत आगमन होत आहे. येणाऱ्या साधु संताचे स्वागत व मोटारसायकल रॅलीत परळी पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक,ईटके काॅर्नर परळी वैद्यनाथ या ठिकानाहुन पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह ३५० साधु संतांचे परळीकरांच्या वतीने स्वागत करून मोटारसायकल शोभा रॅलीस प्रारंभ होईल.ही रॅली शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल ,एकमिणार चौक,स्टेशन रोड,राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक,ते प्रभु वैद्यनाथ मंदिर या ठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे.या रॅली मार्गावर ठिक ठिकाणी पुष्पवृष्ठी करण्यात येणार आहे. नंतर प्रवचन मंडप वैद्यनाथ मंदिर या ठिकाणी पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह सर्व साधुंचे स्वागत व पुजन होणारआहे.त्यानंतर येणार्या सर्व भावीकांना महाराजांचे दर्शन घेता येणार आहे.या सर्व धार्मिक कार्यक्रमास परळी वैद्यनाथ पंचक्रोशीतील भावीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.


Social Plugin