महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळी च्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त परळी शहरातील जिजामाता उद्यान ( गार्डन ) येथे दिनांक 20 ऑगस्ट रोजी निर्भय बनो मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
या मॉर्निंग वॉकला परळी येथील जिजामाता उद्यान ( गार्डन ) दिनांक 20 ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी ठीक 7 वाजता सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या सर्व पदाधिकारी व पुरोगामी विचारांच्या नागरिकांनी पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण केली. त्या नंतर निर्भय बनो मॉर्निंग वॉक करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली.
याप्रसंगी जेष्ठ अंनिस सदस्य जी.एस.सौंदळे,प्रा. विलास रोडे,रानबा गायकवाड,अनिलराव मस्के , अशोक मुंडे,विकास वाघमारे,दिपक शिरसाट, नवनाथ दाने, पत्रकार संभाजी मुंडे, पत्रकार संजीब रॉय, विठ्ठलराव झिलमेवाड,बाळासाहेब किरवले,राहुल सुर्यवंशी,माधव अजले,भगवान राठोड,विनायक काळे,भानुदास उपाडे,आनंद तुपसमुद्रे,सुमित कलशेटे आदी उपस्थित होते.



Social Plugin