लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा
आपला ई पेपर परळी वैजनाथ प्रतिनिधी
देशात विद्यापीठाची समृद्ध परंपरा आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जोपासली असून पुढे घेऊन जात असल्याचे प्रतिपादन डॉ विनोद जगतकर यांनी केले. येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव रविंद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसादजी देशमुख, संचालिका छाया देशमुख, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे व प्रा डॉ विनोद जगतकर, संचालिका छायाताई देशमुख यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. पुढे बोलताना प्रा डॉ विनोद जगतकर यांनी आपल्या व्याख्यानात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या यशस्वी कार्याचा आढावा घेतला. जगाचे ऊर्जास्थान असलेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने हे विद्यापीठ आहे. त्यांचे गौरवशाली जीवनचरित्र सर्वांनी अभ्यासले पाहिजे व त्यांच्या प्रमाणेच आपले वर्तन व कार्य ठेवावे. अध्यक्षीय समारोपात रवींद्र देशमुख यांनी विद्यापीठ वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व डॉ . बाबासाहेबांच्या कार्याचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. यावेळी कविता सादर करताना म्हणाले की,
तुम्हा प्राध्यापकांची नीती देण्याची आहे दर्जेदार शिक्षण ।
मुलींना परिपक्व करून करतात त्यांचे शैक्षणिक रक्षण. ॥
अशा सर्व शिक्षण तज्ज्ञांचा मला सदैव आहे अभिमान ।
सदैव आपली उंची वाढो । वृद्धिंगत व्हावा तुमचा सन्मान ॥
वर्धापन दिन सोहळ्याचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रा डॉ अरुण चव्हाण यांनी केले या सोहळ्यात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


Social Plugin