आपला ई पेपर/परळी/प्रतिनिधी
माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये आज दि 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर डे च्या निमित्ताने परळीतील सर्व सुप्रसिद्ध डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. यावेळी किशोरवयीन मुला-मुलींना वाढत्या वयात शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक बदला संदर्भात अनेक प्रश्न नेहमीच भेडसावतात असतात. त्या प्रश्नांवर आजही आई-वडील, शिक्षक अथवा अन्य कोणाशी मनमोकळेपणाने बोलले जात नाही किंवा मैत्रिणी सोबतही त्या गोष्टी शेअर करता येत नाहीत. अशा वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ.स्वप्निता गुट्टे यांनी आज दि.१ जुलै २०२५ (मंगळवार) रोजी माऊंट लिटेरा झी स्कूल येथील किशोरवयीन मुलींना वाढत्या वयातील विविध समस्या व उपाय बाबत सखोल मार्गदर्शन केले.
माऊंट लिटेरा झी स्कूल मध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत मुलींसाठी आज राष्ट्रीय डॉक्टर डे च्या निमित्ताने हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलीचे वाढते वय १० ते १९ वर्षे वयोगटातील हा काळ अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.या काळात मुला-मुलींच्या अडचणी व समस्यांची जाणीव होऊन त्यांची समाधानकारक उत्तरे मिळणे गरजेचे असते. त्यातून त्यांच्या भावी जीवनावर सकारात्मक परिणाम घडण्यास मदत होते.
याच उद्देशाने माऊंट लिटेरा झी स्कूलचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा, संस्थेचे उपाध्यक्ष कैलास घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने शाळेत निमंत्रित डॉक्टर सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ सौ.डॉ. स्वप्निता गुट्टे यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Social Plugin