Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत वैद्यकीय क्षेत्रात अविस्मरणीय क्षण माऊंट लिटेरा झी स्कूलच्या वतीने सर्व सुप्रसिद्ध डॉक्टरांचा राष्ट्रीय डॉक्टर डे निमित्ताने सत्कार

डॉ. हरिश्चंद्र वंगे, प्रा. कैलास घुगे, प्राचार्य मंगेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवर डॉक्टरांचा सन्मान

परळी / प्रतिनिधी –

राष्ट्रीय डॉक्टर डेच्या निमित्ताने माऊंट लिटेरा झी स्कूल, परळी येथे एक भव्य आणि प्रेरणादायी सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात परळीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर डॉक्टरांचा सन्मान करून त्यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. परळीतील काही डॉक्टरांना या कार्यक्रमाला उपस्थित न राहू शकल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर हरिश्चंद्र वंगे दादा व उपाध्यक्ष प्राध्यापक कैलास घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकांनी परळीतील सर्व वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा घरी जाऊन सन्मान करण्यात आला